
-सचिन गुरव
सिद्धटेक : ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...’ अशा घोषणांनी आज येथील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. त्यातच ''श्रीं''च्या गाभाऱ्यातील मंद सुगंधाचा दरवळ, शोडशोपचारी पूजेवेळी गाभाऱ्यातील मंत्रोच्चार, महिलांनी श्रीगणेशाचे काढलेले लिंबलोण व एकूणच भावभक्तीने भारावलेल्या वातावरणात आजचा गणेश जन्मसोहळा पार पडला.