पावसाळ्यात जनावरांना "हे' होतात आजार; कशी घ्यायची काळजी जाणून घ्या 

Vaccine available for animals in Nevasa taluka from Panchayat Samiti
Vaccine available for animals in Nevasa taluka from Panchayat Samiti

नेवासे (अहमदनगर) : पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, अन्नविषार यासारखे आजार उद्‌भवतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून 2012 च्या 19 व्या पंचवार्षिक पशुगणनेनुसार नेवासे तालुक्‍यातील एक लाख 28 हजार 980 पशुधनाचे लसीकरण करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. 
पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे व वेगवेगळ्या जंतू संसर्गामुळे जनावरांना विविध आजाराची लागण होते. त्यामुळे नेवासे तालुक्‍यात पशुधन विकास अधिकारी दिनेश पंडुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनावरांना लसीकरण राबविली जात आहे. यासाठी एक लाख 335 हजार 370 लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यात फऱ्या 34 हजार तर लसीकरण करण्याची ही मोहीम विभागाकडे घटसर्प आजाराच्या 35 हजार 300 व अन्नविषारच्या 29 हजार 400 एवढ्या लस प्राप्त झाल्या असून, त्या संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात पोहोचही करण्यात आल्या आहेत. सर्व पशु घटकांचा आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात येत आहे. 

नेवासे तालुका पशुधन दृष्टिक्षेपात.... 
नेवासे तालुकयातील दवाखाना श्रेणी- 1 चे 6 व श्रेणी- 2 चे 8 अशा 14 दवाखान्यंतर्गत येणाऱ्या गावात 2012 च्या पशुगणनेनुसार गायी, म्हशीं वर्गीय एकूण मोठी जनावर 99 हजार 980, लहान जनावरे शेळ्या- मेंढ्या 39 हजार. 

पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिनेश पंडुरे म्हणाले, तालुक्‍यात मनसूनपूर्व लसीकरणासाठी घटसर्प, फऱ्या, अन्नविषार अशा लस पोहोच करण्यात आल्या आहेत. दवाखान्यामार्फत लसीकरण सुरु आहे. सदर लसीकरण सामाजिक अंतर पाळून, मास्क, सॅनिटायट्ररचा वापर करुन करण्यात येत आहे. जनावरांना काही आजार आढळल्यास पशुपालकांनी जवळच्या दवाखान्यात संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com