Valentine Day: विदेशी गुलाबांमुळे फुलणार देशी लव्हस्टोरी! डच रोज, लिली, ट्युलिप्सला तरुणाईची पसंती

व्हॅलेंटाईन डेसाठी सर्वांत अगोदर सज्ज होते ती बाजारपेठ. या बाजारपेठेला देशीऐवजी परदेशी गुलाब फुलांचाच रंग चढला आहे. विदेशी फुलांनाच तरुणाईकडून पसंती मिळत आहे.
Valentine Day:  विदेशी गुलाबांमुळे फुलणार देशी लव्हस्टोरी! डच रोज, लिली, ट्युलिप्सला तरुणाईची पसंती

Ahmednagar Valentine Day Flower Demands: व्हॅलेंटाईन डेसाठी सर्वांत अगोदर सज्ज होते ती बाजारपेठ. या बाजारपेठेला देशीऐवजी परदेशी गुलाब फुलांचाच रंग चढला आहे. विदेशी फुलांनाच तरुणाईकडून पसंती मिळत आहे. या विदेशी फुलांमुळे देशी लव्हस्टोरी फुलणार असे चित्र आहे. गुलाबासोबत इतरही फुलांना मागणी आहे. गेल्या आठ दिवसांपासून फुलांची दुकाने सजली आहेत. कालौघात मागे पडलेल्या भेटकार्डांनाही मागणी आहे.

इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅपवर व्हॅलेंटाइन ट्रेंड सुरू आहे. त्यानुसार फुलांना मागणी आहे. फुले विदेशी असली, तरी ते आपल्याच शेतीत पिकतात. मात्र, भारतातील हवामान त्या फुलांना अनुकूल नसल्यामुळे त्या उत्पादनात गुणवत्ता नसते. त्यामुळे ही फुले देश-परदेशांतून आयात करावी लागतात.

या फुलांमध्ये केलीम, ट्युलिप्स, ऑर्केट यांचा समावेश आहे. याचप्रमाणे गुलाबांनाही मोठी मागणी आहे. गुलाबामध्ये विविध रंग उपलब्ध आहेत. लाल, पिवळा, गुलाबी, जेमिलिया, तसेच फुलांना स्प्रे करूनदेखील हव्या त्या रंगाची फुले उपलब्ध करून दिली जातात. रंगवलेल्या एका फुलाची किंमत १८० ते २५० रुपयांच्या घरात आहे. डच गुलाब, गोर्ड गुलाब, लिलियम गुलाब याला ग्राहकांची पसंती आहे. व्हॅलेंटाईन वीकनिमित्त हार्ट शेप, स्क्वेअर शेप, राऊंड शेप, बंज, व्हीआयपी बुकेज विक्री होते. (Latest Marathi News)

चॉकलेट, परफ्यूमलाही मागणी

स्थानिक दुकानांमध्ये मुंबई, गुलटेकडी मार्केटमधून फुले मागवली जातात. काही फुले विदेशातून येतात. फुलांप्रमाणे गिफ्ट खरेदीकडेही तरणाईसह ज्येष्ठांचाही कल आहे. चॉकलेट, परफ्यूम, घड्याळ, ब्रासलेट यांच्या कॉम्बो पॅकला ही अधिक मागणी आहे. मागणी वाढल्याने भाववाढ झाली आहे. चॉकलेट विथ नॅचरल फ्लॉवर्स बुके या नवीन ट्रेंडची सध्या मागणी आहे. ग्राहकांमध्ये युवा वर्गाची संख्या जास्त आहे.

Valentine Day:  विदेशी गुलाबांमुळे फुलणार देशी लव्हस्टोरी! डच रोज, लिली, ट्युलिप्सला तरुणाईची पसंती
Mangaldas Badal : कोण मंगलदास बांदल? शरद पवार गटाच्या नेत्यांना पडला सवाल, शिरूर लोकसभेची केलीय मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com