मागणी वाढल्याने भाज्यांचे दर कडाडले

Vegetable prices rose on Thursday
Vegetable prices rose on Thursday

अहमदनगर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागणी वाढल्याने भाजीपाल्याच्या भावात गुरुवारपासून वाढ दिसून आली. टोमॅटोसह फ्लॉवर व बटाट्याच्या भावात वाढ झाली.

दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी तीव्र उन्हाळ्यातही भाजीपाल्याची आवक वाढली आहे. आवक वाढली असली, तरी मागणीही वाढल्याने भावात वाढ झाली होती. भाजीपाल्याची आवक 685 क्विंटल 87 किलो, तर बटाट्याची 225 क्विंटल 38 किलो आवक झाली. मंगळवारच्या तुलनेत गुरुवारी भाजीपाला व बटाट्याची आवक वाढली. टोमॅटो, कोबी यांच्या भावातही वाढ झाली. 

लॉकडाउनमुळे जास्तीत जास्त भाजीपाला खरेदीवर नागरिकांचा भर असल्यामुळे तो महागला असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. पालेभाज्यांमध्ये तांदूळचा व शेपूच्या भावात आज वाढ दिसून आली. 

प्रतिक्विंटल भाव 

टोमॅटो : 1000 ते 1200, वांगी : 1000 ते 1500, फ्लॉवर : 2000 ते 2400, कोबी : 200 ते 500, काकडी : 800 ते 1000, गवार : 5000 ते 6000, घोसाळी : 2400 ते 3000, दोडका : 2000 ते 2500, कारली : 2000 ते 3000, कैरी : 2000 ते 2500, भेंडी : 2500 ते 3500, वाल : 2500 ते 3500, घेवडा : 3000 ते 4000, बटाटा : 800 ते 1300, लसूण : 4000 ते 5000, हिरवी मिरची : 3000 ते 3500. 

पालेभाज्या (शेकडा) : 
 

मेथी : 500 ते 1200, कोथिंबीर : 500 ते 1000, पालक : 500 ते 1000, करडई : 500 ते 1000, शेपू : 500 ते 1200, कढीपत्ता : 500 ते 1100, मुळा : 500 ते 1000, हरभरा : 5000 ते 6000, डांगर : 500 ते 1000.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com