
अहिल्यानगर : नगर- मनमाड महामार्गाचे काम सुरू करावे, या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी उपोषण सुरू केले होते. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कामास प्रारंभ करून प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी काम वेळेत पूर्ण करण्याचे लेखी दिले आहे. त्यानंतर खासदार लंके यांनी शनिवारी सायंकाळी उपोषण मागे घेतले.