राणेंच्या आरे-कारेला मंत्री तनपुरेंचं प्रत्युत्तर, बालकाचा इगो डोंगराएवढा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

बालक असला तरी त्याचा इगो डोंगराएवढा आहे. आणि तो दुखावल्याने दोन दिवसांपासून तो रडतो आहे. त्याच्याकडे लक्ष देऊ नका, असे म्हणत चंद्रकांतदादा पाटील यांनी काळे झेंडे दाखवण्यापेक्षा पक्षातील बालकाला काही तरी विधायक काम द्यावं म्हणजे ते गप्प बसंल

नगर ः कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्या सध्या ट्‌विटर वॉर सुरू आहे. रोहित यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याने मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राणेंना सबुरीचा सल्ला दिला होता. हा सल्ला देतानाच पवार हे सभ्य आणि सुसंस्कृत कुटुंब आहे, मात्र, टप्प्यात आला की ते कार्यक्रम करतात, असे सांगत सावध केले होते. 

राणे यांना ही टीका जिव्हारी लागली होती. त्यातून त्यांनी राष्ट्रवादी, रोहित पवार, मंत्री तनपुरे यांच्यावर पुन्हा एकेरीवर येत टीका केली होती. तसेच कुठं यायचं..असे ट्विट करीत थेट आव्हान दिलं होतं. 

वाचा तर खरं ः चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना क्रूरपणाचा सल्ला - वहाडणेंचा घरचा आहेर

या टीकेला प्राजक्त तनपुरे यांनी उत्तर दिलं आहे. ते लिहितात, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बालकाच्या नादाला लागू नये. सध्या कोरोनाविरूद्ध लढायचा काळ आहे. बालक असला तरी त्याचा इगो डोंगराएवढा आहे. आणि तो दुखावल्याने दोन दिवसांपासून तो रडतो आहे. त्याच्याकडे लक्ष देऊ नका, असे म्हणत चंद्रकांतदादा पाटील यांनी काळे झेंडे दाखवण्यापेक्षा पक्षातील बालकाला काही तरी विधायक काम द्यावं म्हणजे ते गप्प बसंल, असेही सूचवलं आहे. अपशब्दांचा वापर केला म्हणजे त्याला वाटतं आपण खूप पराक्रम केला.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोरोना विरुद्धच्या लढाईत जीव ओतून कार्य करीत आहेत. प्रत्येकजण आपल्या परीने योगदान देत आहे. परिस्थितीचं गांभीर्य नसलेला एक बालक मात्र स्वतःचा आभाळाएवढा इगो दुखावल्यानं दोन दिवस झाले रडतो आहे. अपशब्दांचा वापर केला की लहान मुलांना वाटतं आपण खूप पराक्रम केला.

 

कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात सध्या ट्विटरवर मोठं युद्ध पेटलं आहे. राष्ट्रवादीचे कार्यर्तेही राणे यांच्यावर तुटून पडले आहेत. राणे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्तेही त्यांचा समाचार घेत आहेत. आता मंत्री तनपुरे यांनी केलेल्या ट्विटला राणे काय आणि कसे उत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Vahadane criticizes Chandrakant Patil