आण्णासाहेब मस्केंनी मतदारसंघ दिला अन् विखे पाटील पहिल्यांदा आमदार झाले...

सातवेळा आमदार, सातवेळा मंत्री अशी त्यांची मोठी राजकीय कारकीर्द राहिली आहे
आण्णासाहेब मस्कें 
राधाकृष्ण विखे पाटील
आण्णासाहेब मस्कें राधाकृष्ण विखे पाटीलsakal

राधाकृष्ण विखे पाटील. राज्याच्या राजकाणाच्या पटावरील एक मोठे नाव. सातवेळा आमदार, सातवेळा मंत्री अशी त्यांची मोठी राजकीय कारकीर्द राहिली आहे. सध्या शिंदे सरकारमधील ते सर्वांत वरिष्ठ मंत्री आहेत. अगदी मुख्यमंत्री शिंदे यांनाही ते वयाने आणि अनुभवाने सिनीयर आहेत. त्यामुळे विखे पाटील यांच्याकडे महसूल सारखं अगदी तगडं खातं आले आहे. त्यामुळे पुढील काळात मंत्रिमंडळावर विखे पाटील यांचा वरचष्मा असणार आहे हे निश्चित.

पण विखे पाटील यांना या टप्प्यापर्यंत पोहचविण्यासाठी माजी आमदार आण्णासाहेब मस्के यांचे मोठे योगदान मानले जाते. खरंतर विखे पाटील यांच्या घराण्याला मोठा राजकीय वारसा. सहकार चळवळीतून राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांचे नेतृत्व पुढे आले होते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात नगर जिल्ह्यामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला होता.

पुढे विठ्ठलराव विखे पाटील यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील यांनीही सहकार चळवळीत पाऊल ठेवले. मात्र सहकारापुरते मर्यादित न राहता त्यांनी राजकारणातही पदार्पण केले. ते खासदार झाले, केंद्रीय मंत्रीपदापर्यंत मजल मारली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतं राधाकृष्ण विखे पाटीलही सहकार आणि राजकारणातून पुढे आले. त्यांचेही नेतृत्व उभे राहिले. १९९५ पासून शिर्डी मतदारसंघातून त्यांची आमदारकीची कारकीर्द सुरु झाली.

त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील यांचे मावसभाऊ आण्णासाहेब मस्के शिर्डीतून आमदार होते. विखे परिवाराच्या निकटवर्तीय असलेले म्हस्के हे सलग तीन वेळा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. झाले होते. बाळासाहेब विखे पाटील व तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची त्यांच्यावर विशेष मर्जी असल्याने त्यांना जलसंपदा विभागाचे राज्यमंत्रीपद देखील मिळाले होते. कायद्याचे पदविधर असलेले म्हस्के हे आजही शेती व सहकारातील जाणकार नेते म्हणून ओळखले जातात.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा कार्यकाल प्रारंभ झाल्यानंतर त्यांनी त्यांना सदैव साथ दिली. १९९५ साली आण्णासाहेब मस्के यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना मतदारसंघ रिकामा करुन दिला. त्यानंतर स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचाराची धुरा वाहिली. आजही विखे पाटील मस्के यांचे ऋणी असल्याचं सांगतात. अण्णासाहेब म्हस्के यांनी माझ्यासाठी मतदारसंघ उपलब्ध करून दिला, मी आमदार होऊन मंत्रिपदाचीही शपथ घेतली, तो माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण होता, अशा शब्दात म्हणतं ते आण्णासाहेब मस्के यांचे ऋण व्यक्त करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com