esakal | केके रेंजचा संभ्रम ः डॉ. विखे म्हणतात, अधिवेशनानंतर काय ते सांगतो
sakal

बोलून बातमी शोधा

Vikhe reveals about the KK range

वास्तविक, सगळ्यात प्रथम या प्रश्नासंदर्भात आपण माजी आमदार शिवाजी कर्डिले, सुजित झावरे यांना सोबत घेऊन केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना भेटून विस्तृत चर्चा केली आहे.

केके रेंजचा संभ्रम ः डॉ. विखे म्हणतात, अधिवेशनानंतर काय ते सांगतो

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : के.के.रेंज जमीन अधिग्रहण बाबत आज नवी दिल्ली येथे दुस-यांदा केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह व लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी भेट घेतली.

या भेटीबाबत डाॅ.विखे म्हणाले, केके रेंज अर्थात खारे कर्जुने रेंज संदर्भात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. केके रेंजसाठी भूसंपादन होणार नसल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांना देण्यात आली. दुसरीकडे सराव सुरू राहील अशीही चर्चा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम आहे.

वास्तविक, सगळ्यात प्रथम या प्रश्नासंदर्भात आपण माजी आमदार शिवाजी कर्डिले, सुजित झावरे यांना सोबत घेऊन केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना भेटून विस्तृत चर्चा केली आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना अवगत केले होते. केवळ संरक्षणमंत्री नव्हे तर देशाचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्याशीदेखील चर्चा करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्याची विनंती केली. स्थानिक शेतकऱ्यांची संवाद साधून त्याबाबतची मते के के रेंज च्या जमिनी संपादित होणार आहेत की नाहीत, त्यासाठी प्रसंगी आपण आपली न्यायालयीन लढा उभारण्याची सुद्धा तयारी केली आहे. मी वारंवार जनतेला सांगितले आहे.

या प्रश्नांसंदर्भात आपण राहुरी, पारनेर आणि नगर तालुक्यातील 23 गावांमधील शेतकऱ्यांबरोबर मागील महिन्यात संवाद साधला होता. के के रेंज साठी जमीन संपादित होणार नसल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांत छापून आल्याचे समजले.

या बाबतचा वस्तुस्थितीदर्शक खुलासा व माहिती कागदपत्रांच्या आधारे आपण लवकरच संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मांडू. के के रेंज जमिनीचे संपादन होणार की नाही यासंदर्भात याबाबतचा संभ्रम दूर करणार असल्याचे विखे यांनी सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर