
श्रीगोंदे : स्थानिक गुंडगिरी, हिंसक प्रवृत्ती आणि चुकीच्या प्रेरणांमुळे तरुणाई गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रकार वाढत आहेत. यावर समाजाने आणि प्रशासनाने कठोर पावले उचलून तरुणांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी भूमिका आमदार विक्रम पाचपुते यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडली.