
नेवासे शहर : तालुक्यातील भालगाव येथील तनपुरे वस्ती रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याबाबत ग्रामस्थांमधून सांगण्यात येते. मुख्य रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्याचे काम स्थानिक ग्रामस्थांनी बंद पाडले आहे.