
कर्जत: ‘भेटी लागे जीवा, लागलीसे आस’ या अभंगातील ओळी प्रमाणे तालुक्यातील अहिल्यानगर-सोलापूर मार्गावरील प्रत्येक गाव, वाडीवस्तीवर पंढरपूर येथे आषाढीवारीसाठी दिंडी सोहळ्यातील जाणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी लगबग सुरू आहे. तालुक्यातील सोलापूर मार्गावरून राज्यातील सर्वाधिक दिंडी सोहळे जातात आणि ही मोठी वारकऱ्यांच्या सेवेची पर्वणी असते.