
"Vivek Kolhe questions who is backing criminals, demands fugitive assistant be produced to police."
Sakal
कोपरगाव: कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अवैधधंदे व दडपशाही कोणत्या आ. का.च्या आशीर्वादाने सुरू आहे? लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहायकाकडून दगडफेक आणि पोलिसांवर हल्ला केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही गोळीबार प्रकरणात आणि अवैध धंद्यांत त्यांचे निकटवर्तीय असल्याचे समोर आले. त्यांना वाचविण्यासाठी आमदार प्रयत्न करतात. मात्र, दर्शना पवार या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनीच्या खून प्रकरणाबाबत चकार शब्दही काढत नाहीत. गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या तुमच्या स्वीय सहायकाला पोलिसांच्या स्वाधीन करा, असे खुले आव्हान सहकार महर्षी कोल्हे कारखाना वार्षिक सभेप्रसंगी युवानेते विवेक कोल्हे यांनी आमदार काळे यांना केले.