लंके, नागवडेंची कोणासाठी माघार; कोल्हेंची तिसरी पिढी बँकेत

Vivek Kolhe Unopposed Director in District Co-operative Bank
Vivek Kolhe Unopposed Director in District Co-operative Bank

नगर ः जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्याचा (गुरुवार) अखेरचा दिवस आहे. आज 18 जणांनी अर्ज मागे घेतले.

कोपरगावमधून तीन जणांनी अर्ज मागे घेतल्याने विवेक बिपीन कोल्हे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या निवडीची आता केवळ औपचारिकता बाकी आहे.

जिल्हा बँकेत माजी मंत्री शंकरराव कोल्हे, त्यांच्या स्नुषा स्नेहलता कोल्हे यांनी संचालक म्हणून काम केले आहे. आता नातू विवेक यांच्या रूपाने तिसऱ्या पिढीची एन्ट्री झाली आहे. 

प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून आज कोपरगावचे किसन पाडेकर, देवेंद्र रोहमारे, बिपीन कोल्हे यांनी अर्ज मागे घेतले. तालुक्‍यातून या मतदारसंघात विवेक कोल्हे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने ते बिनविरोध निवडून आले. 

पारनेर तालुक्‍यातून आमदार नीलेश ज्ञानदेव लंके यांनीही आज अर्ज मागे घेतला. येथे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उदय शेळके, भाजपचे राहुल शिंदे व शिवसेनेचे रामदास भोसले यांचे अर्ज बाकी आहेत. लंके यांनी उदय शेळके यांच्यासाठी अर्ज मागे घेतला असला, तरी उद्या तीन जणांपैकी कोण अर्ज मागे घेणार, यासाठी खलबते होणार आहेत. 

संगमनेर मतदारसंघातून रंगनाथ गोरक्षनाथ फापाळे व दिलीप काशिनाथ वर्पे, श्रीगोंदे तालुक्‍यातून राजेंद्र शिवाजीराव नागवडे व प्रणोती राहुल जगताप, तर श्रीरामपूरमधून कोंडिराम बाबाजी उंडे यांनी आज अर्ज मागे घेतले. 

शेतीपूरक, तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्थांच्या मतदारसंघातून आज नऊ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यांमध्ये भानुदास मुरकुटे, सुभाष गुंजाळ, माधवराव कानवडे, गणपतराव सांगळे, मधुकर नवले, राजेंद्र नागवडे, संभाजी गावंड, उत्तमराव चरमळ, केशव भवर व अरुण येवले यांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com