
पाथर्डी : निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी असा वाद देशभर चर्चेत असतानाच तालुक्यातील मुंगूसवाडे गावातील मतदार यादी चर्चेचा विषय ठरला आहे. ऑनलाईन पद्धतीने या गावाची मतदार यादी पहिल्यानंतर या गावातील अनेक मतदारांची नावे मुंगूसवाडेसह राज्यातील दोन ते तीन मतदारसंघांत आहेत. त्यामुळे मतदार यादीचा मुद्दा गंभीर झाला आहे. \