ग्रामपंचायतीची संपली आता जिल्हा बॅंक निवडणुकीचं धुमशान

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

यंदा प्रथमच गावपातळीवरील निवडणुका बिनविरोध होण्यासाठी नेत्यांनी पुढाकार घेतला. त्यात काही प्रमाणात यश येऊन, 61 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

अहमदनगर : जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे गावोगावचे राजकीय वातावरण तापले होते. त्यासाठी शुक्रवारी मतदान झाल्यावर आता जिल्हा बॅंकेची रणधुमाळी सुरू होणार आहे. बॅंकेच्या 21 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे गावागावांतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यंदा प्रथमच गावपातळीवरील निवडणुका बिनविरोध होण्यासाठी नेत्यांनी पुढाकार घेतला. त्यात काही प्रमाणात यश येऊन, 61 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. हे वातावरण थंड होण्यापूर्वीच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

हे ही वाचा : मतदानाच्या नावाखाली दिवसभर कामाला दांडी
 
जिल्हा बॅंकेच्या मतदारांची अंतिम मतदार यादी सात जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे लवकरच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होण्याचे संकेत मिळाले होते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 21 जागांसाठी 19 ते 25 जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्जविक्री व दाखल करणे, 27 जानेवारीला अर्जांची छाननी, 28 जानेवारीला उमेदवारांची यादी, 28 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारीला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. 20 फेब्रुवारीला मतदान, तर 21 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting for the banks 21 seats will take place on February 20