

The newly installed 12-foot statue of Chhatrapati Sambhaji Maharaj ahead of its grand inauguration in Nagar.
sakal
अहिल्यानगर : नगरवासीयांची धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रतीक्षा आता संपली आहे. सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात उभारण्यात येणाऱ्या महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मंगळवारी (ता. १६) दुपारी ४ वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. १२ फूट उंच ब्राँझ धातूचा हा पुतळा नगरकरांच्या श्रद्धेचा विषय ठरणार आहे.