अहमदनगर : मला ऐतिहासिक शहर पहायचंय ; रोहित पवार

आमदार रोहित पवारांची मागणी; महापालिकेला सदिच्छा भेट
Rohit Pawar
Rohit Pawarsakal

अहमदनगर : नगर शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. पुरातन धार्मिक स्थळे आहेत. हा संस्कृतीचा ठेवा मला एकदा पहायचाय, अशी इच्छा आज आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.महापालिकेत आज आमदार पवार यांनी सदिच्छा भेट दिली. आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे स्वागत करून विविध विभाग फिरवून दाखविले. नगर शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाबाबत त्यांनी माहिती दिली. या वेळी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, शिवसेनेचे नेते संजय शेंडगे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, निखिल वारे, अमोल गाडे, संतोष भोसले, समद खान, आरिफ शेख, निखिल वारे,मनपा उपायुक्त यशवंत डांगे उपस्थित होते.

Rohit Pawar
Uttarakhand Election : मंत्री रावत यांची काँग्रेसमध्ये वापसी

आमदार पवार म्हणाले, की नगर शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिकतेचा परंपरा लाभलेला आहे. शहरात अनेक पुरातन वास्तू मोठ्या दिमाखात उभ्या आहेत. यामध्ये भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, मेमोरियल चर्च, ह्युम मेमोरिअल, मेहराबाबा तसेच शहरातील धार्मिक स्थळे आधी सर्व ऐतिहासिक ठिकाणांची मला पाहणी करायची आहे.

स्मार्ट एलईडीचे कौतुक

शहरात सुरू असलेल्या एलईडी स्मार्ट एलईडी दिव्यांचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले. ही योजना चांगली आहे. महापालिकेचे वीजबिल वाचणार आहे. शिवाय एलईडी खराब झाल्यास तातडीने दुरुस्ती होणार असल्याने ही योजना चांगली आहे. आमदार जगताप यांची दूरदृष्टी चांगली आहे, असे त्यांनी सांगतिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com