

Three-storey building gutted in Ahilyanagar’s massive early morning fire; warehouse completely destroyed.”
Sakal
अहिल्यानगर : शहराच्या मध्यवर्ती परिसरातील बुरुडगल्ली या ठिकाणी मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास तीन मजली जुन्या इमारतीला भीषण आग लागली. चंगेडिया यांच्या मालकीच्या इमारतीत असलेल्या ए. एस. मार्केटिंगचे मोठे गोदाम या आगीत जळून खाक झाले. या भागातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग लागलेल्या इमारती शेजारील इमारतीमधील रहिवाशांना तत्काळ सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. महापालिका आणि लष्कराच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली.