

Farmers celebrate as water reaches Chincholi Shivar after the Benda Bandhara Jal Poojan, with technical help from Thorat Sugar Factory.
Sakal
तळेगाव दिघे: माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दिलेल्या यंत्रणेमुळे पिंपळे चारीतून चिंचोली गुरव येथील बेंदाच्या बंधाऱ्यात पाणी आले. थोरात साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांच्या उपस्थितीत बेंदाच्या बंधाऱ्याचे जलपूजन करण्यात आले.