

Waterlogged fields in Taklibhan; Rabi sowing delayed as farmers await relief from continuous rain.
Sakal
टाकळीभान: सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढे-नाले एक होऊन शेतशिवारात पाणी घुसले होते. यामुळे सोयाबीनसह खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाच्या उघडीपीनंतर शेतातील पाणी ओसरल्यानंतर शेतकऱ्यांनी उरले-सुरले सोयाबीनचे पीक काढले. मात्र, स्वाती नक्षत्रात झालेल्या पावसामुळे शेतशिवार पुन्हा जलमय झाले.