मान्सूनपूर्व पावसाचा अहमदनगर जिल्ह्याला तडाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update monsoon rain in ahmednagar Damage orchards crops Parner electricity problem

मान्सूनपूर्व पावसाचा अहमदनगर जिल्ह्याला तडाखा

अहमदनगर : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने गुरुवारी (ता. १९) काही भागात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शहरासह परिसरात वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, आज दिवसभर नागरिकांना उकाड्याने हैराण केले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाने हजेरी लावली नाही. यंदा दमदार पाऊस होईल, असे अनेकांनी अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. गावा-गावातील यात्रांच्या कालावधीत काही ठिकाणी व्हईकामध्ये पाऊस चांगला होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यंदाच्या वर्षी मान्सूनही वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात मात्र मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने जिल्ह्यातील काही भागात गारवा निर्माण केला होता. नगर शहरात पावसाने गुरुवारी रात्री दमदार हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. यामध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांचा काढून ठेवला कांदा भिजला. सोनई (ता. नेवासे) येथे वीज पडून चार शेळ्या ठार झालेल्या आहेत. रेखा नजन यांच्या या शेळ्या ठार झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.दरम्यान, शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र, शहरासहयंदाच्या वर्षी मान्सूनही वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात मात्र मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने जिल्ह्यातील काही भागात गारवा निर्माण केला होता. नगर शहरात पावसाने गुरुवारी रात्री दमदार हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. यामध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांचा काढून ठेवला कांदा भिजला. सोनई (ता. नेवासे) येथे वीज पडून चार शेळ्या ठार झालेल्या आहेत. रेखा नजन यांच्या या शेळ्या ठार झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.दरम्यान, शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र, शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता. तो रात्री उशिरा सुरू झाला. नेवाशात वीज खंडीतसोनई : नेवासे, कुकाणे, पानेगाव व सोनई परीसरात गुरुवारी (ता.१९) वादळी वारा व रिमझिम पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. झाडे व विजेचे खांब पडल्याने अर्धा तालुका रात्रभर अंधारात होता. सोनई, घोडेगाव, खरवंडी, कांगोणी भागात पंधरा ते वीस मिनिटे वादळी वारा झाला. विजेचा कडकडाट व नंतर झालेल्या पावसाने कांद्याचे नुकसान झाले. खेडलेपरमानंद रस्त्यावर मोठे झाड पडल्याने तीन तास वाहतूक ठप्प होती. काही भागात वीजेचे खांब व विद्युत वाहिन्या तुटल्याने पुरवठा खंडित करण्यात आला होता.

पारनेरला पिकांसह फळबागांचे नुकसान

पारनेर : तालुक्याच्या बहुतेक भागांमध्ये गुरुवारी (ता.19) रात्री दहाच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मध्यरात्रीपर्यंत विजेचा कडकडाटासह पाऊस सुरू होता. काही ठिकाणी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. काल रात्री पावसाला अनानक सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. सध्या तालुक्यात कांदा काढणी जोरात सुरू आहे. त्यामुळे काढलेला कांदा झाकण्यासाठी पारनेरला पीकांसह फळबागांचे नुकसानशेतकऱ्यांची धांदल उडाली. अचानक आलेला पाऊस व जोरदार वारा या मुळे शेती पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. रात्री अचानक वादळी वारा सुटल्याने शेतकऱ्यांना कांदा झाकण्यास संधीच मिळाली नाही. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे इतर शेतमालाचे ही मोठे नुकसान झाले.

वादळ वाऱ्यामुळे वीज गायब झाली होती.तालुक्यात पारनेरसह सुपे परिसर टाकळी ढोकेश्वर, कान्हूर पठार, गोरेगाव, भाळवणी या परिसरांमध्ये पावसाने हजेरी लावली. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता. रोहणी नक्षत्रापूर्वी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना आता खरिप हंगामा पूर्वीच्या मशागतीची सुरवात करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. यंदाच्या हंगामात बियाण्याचे दर वाढल्याने शेतकरी चिंतातूर आहे. ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता. तो रात्री उशिरा सुरू झाला. नेवाशात वीज खंडीत सोनई : नेवासे, कुकाणे, पानेगाव व सोनई परीसरात गुरुवारी (ता.१९) वादळी वारा व रिमझिम पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. झाडे व विजेचे खांब पडल्याने अर्धा तालुका रात्रभर अंधारात होता. सोनई, घोडेगाव, खरवंडी, कांगोणी भागात पंधरा ते वीस मिनिटे वादळी वारा झाला. विजेचा कडकडाट व नंतर झालेल्या पावसाने कांद्याचे नुकसान झाले.

खेडलेपरमानंद रस्त्यावर मोठे झाड पडल्याने तीन तास वाहतूक ठप्प होती. काही भागात वीजेचे खांब व विद्युत वाहिन्या तुटल्याने पुरवठा खंडित करण्यात आला होता. पारनेरला पिकांसह फळबागांचे नुकसान पारनेर : तालुक्याच्या बहुतेक भागांमध्ये गुरुवारी (ता.19) रात्री दहाच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मध्यरात्रीपर्यंत विजेचा कडकडाटासह पाऊस सुरू होता. काही ठिकाणी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. काल रात्री पावसाला अनानक सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. सध्या तालुक्यात कांदा काढणी जोरात सुरू आहे. त्यामुळे काढलेला कांदा झाकण्यासाठी पारनेरला पीकांसह फळबागांचे नुकसानशेतकऱ्यांची धांदल उडाली. अचानक आलेला पाऊस व जोरदार वारा या मुळे शेती पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले.

विशेषतः आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. रात्री अचानक वादळी वारा सुटल्याने शेतकऱ्यांना कांदा झाकण्यास संधीच मिळाली नाही. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे इतर शेतमालाचे ही मोठे नुकसान झाले. वादळ वाऱ्यामुळे वीज गायब झाली होती.तालुक्यात पारनेरसह सुपे परिसर टाकळी ढोकेश्वर, कान्हूर पठार, गोरेगाव, भाळवणी या परिसरांमध्ये पावसाने हजेरी लावली. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता. रोहणी नक्षत्रापूर्वी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना आता खरिप हंगामा पूर्वीच्या मशागतीची सुरवात करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. यंदाच्या हंगामात बियाण्याचे दर वाढल्याने शेतकरी चिंतातूर आहे.

Web Title: Weather Update Monsoon Rain In Ahmednagar Damage Orchards Crops Parner Electricity Problem

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top