esakal | ‘विकेंड’मुळे शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक बदलणार? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

scholarship

‘विकेंड’मुळे शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक बदलणार?

sakal_logo
By
दौलत झावरे

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. दरवर्षी ही परीक्षा मार्चमध्ये विशेष म्हणजे रविवारीच घेतली जाते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली असून, ती २५ जुलैला घेण्याचे नियोजन आहे. मात्र विकेंड लॉकडाउनमुळे परीक्षेचा दिवस व तारखेत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (weekend-will-change-schedule-of-scholarship-exams-marathi-news-jpd93)

शिष्यवृत्तीची परीक्षेच्या तारखेत बदल होण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दरवर्षीच इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून इयत्ता पाचवीचे ३० हजार ११५, तर आठवीचे १६ हजार ९६१ विद्यार्थी बसलेले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा २५ जुलैला घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आलेले आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात आढावा घेण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा घेण्याबाबत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने मागविलेला आहे. नगर जिल्ह्याने परीक्षा घेण्यास हरकत नसल्याचे पत्र दिलेले आहे. त्यामुळे ही परीक्षा जुलैत होणार की आॅगस्टमध्ये, याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.

हेही वाचा: लस न घेताच ऑनलाइन प्रमाणपत्र; लसीकरणाचा सावळा गोंधळ उघडकीस

हेही वाचा: नगर बाजार समितीत आवक वाढल्याने टोमॅटो स्वस्त; घेवडा महागला

loading image