Why a case has been registered against the Deputy Tehsildar of Sangamner ...
Why a case has been registered against the Deputy Tehsildar of Sangamner ...

संगमनेरच्या नायब तहसीलदारांना कोरोनाची लागण, तरीही गुन्हा दाखल...संघटना म्हणते ठीक नाही झालं

Published on

संगमनेर : कोरोना साथ रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा प्रवासबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी, नायब तहसीलदार सुभाष बाबूराव कदम (वय 42) यांच्याविरुद्ध साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये काल (मंगळवारी) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब मधुकर यादव (वय 48) यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की तालुक्‍यातील महसूल विभागात नायब तहसीलदार म्हणून जबाबदारी असलेल्या कदम यांनी वैयक्तिक कारणासाठी 30 मे ते 6 जून या कालावधीत वाहनाने संगमनेर ते पुणे असा आंतरजिल्हा प्रवास केला. कोरोना प्रादूर्भाव काळात जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये प्रवासबंदीच्या नियमाचा यामुळे भंग झाला आहे. 

आंदोलनाचा इशारा 
दरम्यान, या अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ महसूल विभागातील संघटना पदाधिकाऱ्यांनी आज प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना निवेदन देऊन, गुन्हा मागे घेण्याची मागणी केली. या वेळी तहसीलदार अमोल निकम उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की संगमनेरात अडकलेल्या परप्रांतीय कामगारांची घरवापसी करताना अज्ञाताकडून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्‍यता आहे. सध्या ते पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा नाजूक वेळी त्यांना साथ न देता, घाईत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने आपत्तीत जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची झाले आहे. दाखल केलेला गुन्हा त्वरित मागे घ्यावा अन्यथा आपत्ती व्यवस्थापनाचे काम सोडून महसूलच्या अन्य कामांवर बहिष्कार टाकण्याचा आक्रमक इशारा लिपिक वर्गीय महसूल संघटनेसह तलाठी संघटनेने दिला आहे. निवेदनावर महसूल विभागातील सुमारे साठ अधिकारी, कर्मचारी, तलाठी व मंडलाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. 

राजपत्रित अधिकारीही आक्रमक 
दरम्यान, राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानेही नायब तहसीलदारांविरुद्धच्या गुन्ह्याचा निषेध केला आहे. कोरोना वॉरिअर म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध केलेली ही कारवाई मागे न घेतल्यास आपत्ती व्यवस्थापनाचे काम वगळता अन्य सर्व कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्यासह 27 अधिकाऱ्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com