
राहुरी: ब्राह्मणी येथे दारुड्या पतीच्या मारहाणीला कंटाळून पत्नीने शेतातील आंब्याच्या झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंत्यविधीनंतर पती गुपचूप फरार झाला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात त्यांच्या मुलाने वडिलांच्या विरोधात फिर्याद देऊन वडिलांनी आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.