

Agitation Over Land Rights Intensifies as Ajit Kale Announces Protest
sakal
श्रीरामपूर: १०७ वर्षांपासून सुरू असलेला आकारी पडीत जमिनींचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. न्यायालयीन लढाई जिंकूनही राजकीय व्यवस्थेने यात खोडा घातला आहे. त्यामुळे आता सरकारला जाग आणण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावरची लढाई लढली जाईल. जोपर्यंत आमच्या हक्काच्या जमिनी परत मिळत नाहीत, तोपर्यंत उपसलेले हे हत्यार म्यान होणार नाही, असा निर्धार शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी व्यक्त केला.