esakal | पारनेरच्या रस्त्यांना प्राधान्य देणार - डॉ. सुजय विखे पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

MP Dr. Sujay Vikhe Patil

पारनेरच्या रस्त्यांना प्राधान्य देणार - डॉ. सुजय विखे पाटील

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

टाकळी ढोकेश्वर (जि. नगर) : ‘‘ग्रामीण भागातील, विशेषत: दुर्गम भागातील गावे अजूनही रस्त्यांपासून दूर आहेत. रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना शेतमाल नेण्यात अडचणी येतात. पारनेरमध्ये रस्त्यांना प्राधान्य देणार आहोत. विकासासाठी सुजित झावरे प्रयत्नशील आहेत. तालुक्यास सर्वाधिक २५ कोटींचा निधी दिला,’’ असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. (Will give priority to roads in parner says dr sujay vikhe patil)


तिखोल (ता. पारनेर) येथील तिखोल - बहिरोबावाडी- किन्ही- करंदी या १२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत खासदार विखे पाटील यांच्या प्रयत्नातून ७ कोटी ६८ लाख रुपये मंजूर झाले. कामाचे भूमिपूजन डॉ. विखे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषदेच्या जलसंधारण व्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, महिलाध्यक्ष अश्विनी थोरात, युवक जिल्हाध्यक्ष अमोल मैड, डॉ. भाऊसाहेब खिलारी, सुभाष दुधाडे, अरुण ठाणगे उपस्थित होते.

सुजित झावरे म्हणाले, की ‘‘मी कोणत्याही पक्षात असू द्या; त्या पक्षाच्या नेत्यांकडून तालुक्यातील विकासकामांसाठी निधी आणण्याचा माझा प्रयत्न असतो. राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळीही वरिष्ठ नेत्यांकडून तालुक्यासाठी झुकते माप देण्याचा प्रयत्न केला. पक्ष हे फक्त माध्यम आहे. जेथे जाऊ, तेथे तालुक्यासाठी विकासकामे आणण्याचा आपला मानस असतो.’’

हेही वाचा: राज्यात लसीकरणाचा सावळा गोंधळ : डॉ. सुजय विखे पाटील

पारनेर तालुका जिल्ह्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा तालुका आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पठारी भाग आहे. या भागात अनेक गावे व वाड्या-वस्त्या आहेत. येथील शेतकऱ्यांना दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यासाठी मी विशेष परिश्रम घेणार आहे.
- सुजय विखे पाटील, खासदार

हेही वाचा: पावसाने नगर महापालिकेच्या गटारस्वच्छतेचे पितळ उघडे

loading image