
Members of the Nandiwale Tirmali community protest at Ahilyanagar DM office demanding government reservation.
Sakal
अहिल्यानगर: राहण्यासाठी जागा नाही..., शेती नाही..., मुलांना उच्च शिक्षण दिले. पण नोकरी नाही..., रोजगार नाही..., हाताला काम नाही..., अशा हृदयस्पर्शी व्यथा मांडत नंदीवाले तिरमली समाजाने आज (ता.१८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अनुसूचित जमातीचा दर्जा मिळून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. तातडीने हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्याकडे करण्यात आली.