

Police raid an abandoned house in Ahilyanagar where witchcraft rituals were performed in search of a mythical golden box.
Sakal
राजूर: जमिनीमध्ये पुरलेली सोन्याची पेटी मिळावी, यासाठी पडक्या घरात जादूटोणा करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार राजूर मध्ये घडला आहे. घर मालक गिरीश विनायक बोऱ्हाडे यानेच हा जादूटोणा करण्यासाठी एका महिलेसह चौघांना दहा हजार रुपये दिले होते. जादूटोणा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.