

Shirdi Market Murder: Police Uncover Fresh Leads in Woman's Killing Case
sakal
शिर्डी: जुन्या वादातून महिलेनेच महिलेवर चाकूने वार करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार शिर्डी येथे रविवारी (ता. १९) रात्री घडला. साई समाधी मंदिराजवळ असलेल्या दक्षिण बाजूच्या रस्त्यावर ही घटना घडली. जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय २७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर फिजा पटेल (वय २१) असे आरोपी महिलेचे नाव आहे.