अहमदनगर : दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 arrested

अहमदनगर : दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक

अहमदनगर : शहरातील सावेडीतील तपोवन भागात घरफोडी करून दागिने चोरणाऱ्या महिलेला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी वैष्णवी शुभम बडे उर्फ वैष्णवी उनवणे (वय 20, रा. तपोवन रस्ता, सावेडी) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

सुप्रिया अभय बोरा (वय 29, रा. छत्रपतीनगर, तपोवन रस्ता, अहमदनगर) या कुटुंबियांसह राहत आहेत. मुलांचे क्‍लास घेणारे शिक्षक साळवे (रा. शिक्षक कॉलनी, एम.आय.डी.सी. अहमदनगर) यांच्या ता. 11 मार्च रोजी वाढदिवस असल्याने कुटुंबासह दुपारी त्या गेल्या होत्या. त्या सायंकाळी घरी आल्या, त्यावेळेस बेडमध्ये असलेला कपाटाचा दरवाजा उघडा होता. चोरटयाने घरातील कपाट उघडून सोन्याची गळ्यातील चैन व त्यातील लॉकेट, कानातील रिंगा, हाताच्या बोटातील दोन अंगठया, कानातली बाळी, कानातले रिंगा, नाकातील दोन मुरण्या, दोन ओम पान, सटवाई, पायातील पैजन, लक्ष्मी कॉइन चार, रोख रक्कम असा 59 हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा: अहमदनगर : चार दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज तात्पुरते मागे

पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंके हे तपास करीत होते. त्यांना तपासामध्ये माहिती मिळाली की सदरची घरफोडी आरोपी वैष्णवी शुभम बडे उर्फ वैष्णवी उनवणे (वय 20, रा. जुना पिंपळगाव रस्ता, शिवनगर चौक) या महिलेने केली आहे. उपनिरीक्षक सोळुंके यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेब गिरीगोसावी, दत्तात्रय जपे, शैलेश गोमसाळे, सतीश त्रिभुवन, गौतम सातपुते, गोरख धाकतोडे, महिला पोलिस विद्या मोरे, अनिता मरबळ यांच्या पथकाने महिला आरोपी वैष्णवी राहत्या घरून ताब्यात घेऊन चौकशी केली, तिने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा: अहमदनगर : गावरान गायीच्या गोवऱ्यांना नगरकरांची पसंती

Web Title: Woman Arrested For Stealing Jewelery Ahmednagar Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..