
अहिल्यानगर: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका वृध्द महिलेला एका अनोळखी व्यक्तीने थांबवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडविले व त्यांच्या गळ्यातील सुमारे चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले. ही घटना सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील संकल्प हॉटेलसमोर दळवी मळा परिसरात २६ जुलै रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली.