esakal | महिला चुल आणि मुल यातून बाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत
sakal

बोलून बातमी शोधा

Women are working out of chul and children are working shoulder to shoulder with men

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला बचत गट स्थापन करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.

महिला चुल आणि मुल यातून बाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पोहेगाव (अहमदनगर) : माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला बचत गट स्थापन करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. महिला चूल आणि मूल यातून बाहेर पडून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. 

तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांमध्येही खूप काही कला दडलेल्या आहेत. त्या विकसित करणे महत्त्वाचे आहे. रांगोळी स्पर्धा घेऊन तालुक्यातील चांदेकसारे येथे साई आधार बहुउद्देशीय संस्थेने मुली व महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन संजीवनी महिला बचत गट बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांनी केले.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे साई आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होत्या. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष केशव होन यांनी महिलांसाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. 

यावेळी मोनिका संधान, संजय होन, उपसरपंच विजय होन, शांताबाई होन, सुलोचना होन, चंचल होन, सुनिता होन, मिराताई होन, सीमाताई पवार, योगिता होन, स्पर्धेचे परीक्षक प्रा. गणेश सपकाळ, संतोष तांदळे, उमाकांत भांबरे, शोभाताई दिघे, रेश्मा आव्हाड अदीसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिपक्यांची, संस्कार भारती, निसर्गचित्र, व्यक्तिचित्र या प्रकारात रांगोळी काढून 105 महिलांनी आपली कला सादर केली. या स्पर्धेत अ गटातील भक्ती होन, श्रुती खरात, साक्षी झगडे, आरजु सय्यद, आदित्या होन या विजेत्या स्पर्धकांना दहा ग्रॅम चांदीचे नाणे व उपविजेत्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ पाच ग्रॅम चांदीचे नाणे यासह प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देण्यात आले.

तर ब गटातील मोनाली होन, अश्विनी खरात, प्रियांका होन, पल्लवी तुवर, रूपाली आहेर, अनिता पाटील, कीर्ती होन या विजेत्या महिलांना पैठणी, दहा ग्रॅम चांदीचे नाणे, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व उपविजेत्या महिलांना उत्तेजनार्थ पाच ग्रॅम चांदीचे नाणे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक रेणुका कोल्हे व मोनिका संधान यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन शोभा दिघे यांनी केले तर आभार उपसरपंच, विजय होन यांनी मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर