महिला आयोगाच्या अध्यक्षांना धमकी देणाऱ्यास अटक

धमकी देणाऱ्या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनत चिंचोडी पाटील येथून ताब्यात घेतले
Women Commission chairperson rupali chakankar threat accused arrested
Women Commission chairperson rupali chakankar threat accused arrestedsakal

अहमदनगर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनत आज सकाळी चिंचोडी पाटील (ता. नगर) येथून ताब्यात घेतले आहे. भाऊसाहेब रामदास शिंदे (रा. भेंडा ता. नेवासा) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर कार्यालयात असताना त्यांना धमकीचा फोन आला होता.

पुढच्या २४ तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारु, असा हा धमकीचा फोन होता. अहमदनगरमधील व्यक्तीने फोन केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरली. सहायक निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या पथकाने चिंचोडी पाटील गावातून शिंदे याला ताब्यात घेतले आहे. पुणे गुन्हे शाखेचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी निघाले आहे. शिंदे हा पूर्वी मुंबईला परिचारक म्हणून काम करत होता. त्याला तेथून काढून टाकण्यात आलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com