
Women in Bhokar lead a strong protest march demanding liquor ban; Ogle promises action within a week.
esakal
टाकळीभान: दारूमुळे मुलाबाळांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. संसार उदध्वस्त होत आहे. मुलांचे भविष्य घडवायचे कसे? आम्ही जगायचे कसे? असे सवाल करत भोकर (ता. श्रीरामपूर) येथील महिलांनी दारूबंदीसाठी आमदार, तहसीलदार, पोलिस ठाणे, दारूबंदी व उत्पादन शुल्क कार्यालयावर मोर्चा काढला. आठवड्याभरात दारूबंदी करण्याचे आश्वासन देत आमदार हेमंत ओगले यांनी प्रशासनाला सूचना दिल्या, तर पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनीही त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन महिलांना दिले.