ही महिला लिफ्ट मागते नि लुटते

नगरमधील अनेकांना घातला गंडा
Women rob people under the pretext of elevators
Women rob people under the pretext of elevatorsWomen rob people under the pretext of elevators

नगर ः लिफ्टच्या बहाण्याने चालकांना लुटणाऱ्या महिलेला जेरबंद करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले. आरोपी सुनीता भाऊसाहेब भगत (वय 43, रा. जेऊर, ता. नगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

तोफखाना पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 13) दोन व्यक्‍तींना लिफ्टच्या बहाण्याने लुटण्यात आल्याच्या तक्रारी दाखल होत्या. टेम्पोचालक विजय किसन चौधरी (वय 51, रा. मिस्कीन मळा, सावेडी) यांना दुपारी एक वाजता झोपडी कॅंटीन भागात एका महिलेने लिफ्ट मागितली. हुंडेकरी लॉन भागात जायचे असल्याचे सांगितले. त्यांनी लिफ्ट दिली.

टेम्पो हुंडेकरी लॉन भागात आल्यावर या महिलेने भाडे देण्याच्या कारणातून वाद सुरू केला. टेम्पो डॉन बॉस्को पुलाजवळ बाजूला घेण्यास सांगितले. तेथे त्यांना शिवीगाळ करून बळजबरीने पाकिटातील 3200 रुपये घेऊन पोबारा केला.

शांतिलाल कपूरचंद भंडारी (रा. आनंदनगर, स्टेशन रस्ता) यांनाही एका महिलेने लिफ्टच्या बहाण्याने दुपारी 12 वाजता महावीरनगर भागात दीड हजारांना लुटले होते. त्यांनीही तोफखाना पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. संशयित महिला आरोपी सुनीता भाऊसाहेब भगत (वय 43, रा. काळे वस्ती, जेऊर, ता. नगर) हिला अटक करण्यात आली. तिने दोघांना लुटल्याची कबुली पोलिसांना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com