Crime News : बिल काढण्यासाठी घेतली लाच; महिला सरपंचाला पतीसह अटक

कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडे ४६ हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कोकणगावच्या महिला सरपंच व त्यांच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले.
crime news
crime newsesakal

श्रीगोंदे - कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडे ४६ हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कोकणगावच्या महिला सरपंच व त्यांच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. श्रीगोंदे पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

महिला सरपंच उज्ज्वला सतीश रजपूत व पती सतीश बबन रजपूत या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की तक्रारदार शासकीय ठेकेदार असून कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ता दुरुस्ती, संरक्षण भिंत बांधकाम या कामांचा ठेका ४ लाख ६१ हजार ५६८ रुपयांमध्ये घेतला होता.

ठेकेदार यांनी मुदतीत सर्व कामे पूर्ण केली. त्यानंतर कामाचे बिल जमा करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने सरपंच व त्यांच्या पतीला विनंती केली. त्यावर एकूण बिलाच्या १० टक्क्यांप्रमाणे ४६ हजार रुपयांची लाच मागणी करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ठेकेदाराने तक्रार दाखल केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला असता महिला सरपंच व पती दोघांनी लाच स्वीकारण्याचे संमती दर्शविली. बिल जमा झाल्यानंतर गुरुवारी (ता. २३) आरोपी उज्ज्वला रजपूत या महिला सरपंचाकडून ठेकेदाराला लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगण्यात आले होते.

पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, अंमलदार रमेश चौधरी, बाबासाहेब कराड, सचिन सुद्रिक, रवी निमसे, संध्या म्हस्के, राधा खेमनर यांनी ही सापळा कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com