टाकळी ढोकेश्वरमधील कोविड सेंटरमध्ये विश्वशांतीसाठी यज्ञ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटरमध्ये यज्ञ

पर्जन्य यज्ञाद्वारे पाऊस पडत असल्याचा संदर्भ ज्ञानेश्वरी ग्रंथातही आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचे वैश्विक संकट आलेले आहे.

टाकळी ढोकेश्वरमधील कोविड सेंटरमध्ये विश्वशांतीसाठी यज्ञ

टाकळी ढोकेश्वर : कोरोनाचे आलेले संकट लवकर दूर व्हावे, सर्वांना निरामय आरोग्य लाभावे यासाठी टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) येथील माजी आमदार स्व.वसंतराव झावरे पाटील कोव्हिड सेंटरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या पुढाकारातून विश्वशांती लोककल्याण यज्ञ करण्यात आला.

अध्यात्मातून आरोग्याकडे या संकल्पनेतून या यज्ञाचे आयोजन करण्यात आले. कोरोनारुपी आलेले हे वैश्विक संकट दूर व्हावे अशी प्रार्थना करण्यात आली. (yadhya at covid Center at Takli Dhokeshwar)

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या आमदाराला पवारांनी ब्रीच कँडीत हलवलं

या कोविड सेंटरमध्ये दाखल झालेले अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांनीही या सेंटरमुळे आपणास आधार मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.रुग्णांना सेवा देण्याबरोबरच अध्यात्मातून निरामय आरोग्याकडे या संकल्पनेतून कोरोनाचे संकट टळावे यासाठी विश्वशांती यज्ञ करण्यात आला. पुरातन काळापासून यज्ञांस अनन्यसाधारण महत्त्व आहे

या संदर्भात माहिती देताना सुजित झावरे म्हणाले की, होमहवन ही अंधश्रद्धा नसून अग्निद्वारे परमेश्वर व वैश्विक शक्तीला आवाहन करण्याचीही संकल्पना आहे. पूर्व इतिहास पाहता वेगवेगळ्या राज्यांवर आलेले संकट टळण्यासाठी त्या काळातील राज्यकर्त्यांनी होमहवन केल्याचे दाखले आहेत.

पर्जन्ययज्ञामुळे पावसाचा ज्ञानेश्वरीत संदर्भ

पर्जन्य यज्ञाद्वारे पाऊस पडत असल्याचा संदर्भ ज्ञानेश्वरी ग्रंथातही आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचे वैश्विक संकट आलेले आहे. हे संकट दूर व्हावे यासाठी विश्वशांती यज्ञ करण्यात आला. ११ ब्रह्मवृंदाद्वारे या यज्ञात सुरुवात करण्यात आली. विविध प्रकारच्या वनौषधींची समिधा यज्ञात देण्यात आल्या. यावेळी नवग्रहशांती व रुद्राभिषेक करून भगवान शंकराला शरण जाऊन हे संकट टळावे अशी प्रार्थना करत ईश्वराला साकडे घालण्यात आले.

((yadhya at covid Center at Takli Dhokeshwar))

loading image
go to top