Ahilyanagar Weather: अहिल्यानगरला येलो अलर्ट! भीमा-गोदावरीच्या पाणीपातळीत वाढीचा इशारा; प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन

Heavy rain advisory for Ahilyanagar: भीमा-गोदावरीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; धरण परिसरातील पर्यटक व नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम काटेकोर पाळण्याचे आवाहन
IMD Issues Yellow Alert for Ahilyanagar Amid Rising Water Levels in Bhima and Godavari

IMD Issues Yellow Alert for Ahilyanagar Amid Rising Water Levels in Bhima and Godavari

sakal

Updated on

अहिल्यानगर: भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील वाढता विसर्ग आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या तसेच धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com