तरूणांनो ठिबक सिंचन शेतकऱ्यांबरोबरच तुमच्याही फायद्याचे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करणे काळाची गरज आहे. तरुण शेतकऱ्यांना ठिबकचे महत्त्व समजत आहे.

राहुरी : तरुणांनी ठिबकचे नवनवीन देखभाल दुरुस्ती तंत्रज्ञान आत्मसात करून घेणे आज काळाची गरज आहे. असे नगरच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प उपसंचालक राजाराम पाटील यांनी सांगितले.

राहुरी येथे धिमते वस्ती (नांदूर रोड) येथे तालुका कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नगर व ड्रिप डिलर असोसिएशनतर्फे शेतकऱ्यांसाठी दोन दिवसांचे कौशल्य आधारित प्रशिक्षण वर्गात ठिबक सिंचन देखभाल व दुरुस्ती विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

उपविभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, कृषी मंडळ अधिकारी प्रशांत डहाळे, राहुल ढगे, ड्रिप डिलर असोसिएशनचे अध्यक्ष विलास तरवडे, दत्तात्रेय कवाणे, योगेश वने, कैलास शेळके, दिनेश झावरे, निखिल कोहकडे उपस्थित होते. 

काचोळे म्हणाले, की "उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करणे काळाची गरज आहे. तरुण शेतकऱ्यांना ठिबकचे महत्त्व समजत आहे. त्यामुळे, ठिबकचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. ठिबक संच देखभाल दुरुस्तीकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक धीरज कदम व अमोल आंधळे यांनी कार्यशाळेचे नियोजन केले. शंभरावर शेतकऱ्यांनी कार्यशाळेत भाग घेतला. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young drip irrigation benefits you as well as farmers