esakal | सिन्नरच्या तरुणाचा मारहाणीमध्ये मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

A young man has died while being beaten in Sinnar

काही जणांनी लाकडी दांडक्‍याने केलेल्या मारहाणीत राहुल जबर जखमी झाला होता. त्यास तातडीने साई संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सिन्नरच्या तरुणाचा मारहाणीमध्ये मृत्यू

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

राहाता (अहमदनगर) : मोबाईलवर आक्षेपार्ह मेसेज पाठविल्याच्या रागातून काही जणांनी केलेल्या मारहाणीत राहुल जेजूरकर (वय 27, रा. नायगाव, ता. सिन्नर) याचा मृत्यू झाला. याबाबत त्याचा पुतण्या श्‍याम जेजुरकर याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रवीण बनकर व त्याचा भाऊ सचिन बनकर (रा. राहाता), तसेच आणखी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
फिर्यादीनुसार, पत्नीला मोबाईलवर आक्षेपार्ह मेसेज पाठवित असल्याच्या कारणावरून आरोपी प्रवीण बनकर याने राहुल जेजुरकर व फिर्यादीस राहाता येथे बोलावून घेतले. तेथे काही जणांनी लाकडी दांडक्‍याने केलेल्या मारहाणीत राहुल जबर जखमी झाला होता. त्यास तातडीने साई संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक सुभाष भोये तपास करीत आहेत.