
जामखेड : तालुक्यातील शिऊरफाट्यावरील एका हॉटेलमध्ये रात्रीच्या सुमारास वेटरने तरुणास लाकडी काठीने मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी वेटरला अटक केली आहे. ज्योतीराम शामराव काशिद (वय ३६, रा. काशिद वस्ती, सारोळा, ता. जामखेड) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.