जनावरांसाठी शेततळ्यातून पाणी काढत असताना पाय घसरून तरुणाचा मृत्यू

शांताराम जाधव
Friday, 20 November 2020

जनावरांसाठी शेततळ्यातून पाणी काढत असताना, पाय घसरून तळ्यात पडल्याने तरुणाचा गुंजाळवाडी पठार येथे मृत्यू झाला.

बोटा (अहमदनगर) : जनावरांसाठी शेततळ्यातून पाणी काढत असताना, पाय घसरून तळ्यात पडल्याने तरुणाचा गुंजाळवाडी पठार येथे मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. धनंजय दादाभाऊ आगलावे (वय 22), असे मृत तरुणाचे नाव आहे.

गुंजाळवाडी पठार येथील दादाभाऊ गोपीनाथ आगलावे यांचा मुलगा धनंजय घराच्या मागील बाजूस असलेल्या शेततलावावर गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेला होता. पाणी काढताना पाय घसरून तो शेततळ्यात पडला. धनंजयला पोहता येत नसल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. परिसरातील सीताराम वाळुंज यांनी स्थानिकांना आवाज दिल्यानंतर काही शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह बाहेर काढला. पोलिस पाटील शिवप्रसाद दिवेकर यांनी घारगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे तपास करीत आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth dies after slipping while fetching water from farm

Tags
टॉपिकस
Topic Tags: