
अकोले : कोणतेही संकट येऊ दे, बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन पायी चालतच जाऊन घ्यायचे, असा निर्धार करून राजस्थानातील २४ वर्षांच्या युवकाने साडेपाच हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्याचे राजूर येथे आगमन झाल्यानंतर आपल्या प्रवासाविषयी माहिती दिली. या अवलियाचे नाव आहे अभिषेक श्यामलाल शर्मा. तो मूळचा सिक्कर जिल्ह्यातील आहे.