

Illegal Excavation Probe Turns Tragic as Youth Dies in JCB Collision
sakal
नगर तालुका: नगर तालुक्यातील धनगरवाडी परिसरात बेकायदेशीरपणे मुरुम चोरी करून पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला जेसीबीने धडक दिली. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी राम उर्फ गणेश मधुकर म्हस्के (वय ३५, रा. जेऊर बायजाबाई, ता. जि. अहिल्यानगर) याला जेसीबीसह ताब्यात घेतले आहे.