

Police presence at the spot after a violent clash claimed one life in Ahilyanagar district.
Sakal
सोनई : कांगोणी रस्त्यावर असलेल्या वडघुले वस्तीवर जुन्या घराच्या शेडजवळ भाऊबंदकीचा वाद शिगेला पोहोचला आणि झालेल्या तुंबळ हाणामारीत अनेक गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या ३६ वर्षीय युवकाचा खून झाला आहे. त्यास मारहाण करणारे तिघे जण सुद्धा गंभीर जखमी झाले. सोनई पोलिसांनी तीन जखमी आरोपीसह एका महिलेस अटक केली आहे.