
जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या खांद्यावर आहे. जिल्ह्यातील एक हजार 602 गावांतील नागरिकांना 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 555 उपकेंद्रांमार्फत आरोग्य सुविधा पुरविल्या जातात.
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत असलेल्या 96 प्राथमिक व 555 उपकेंद्रांतील आगप्रतिबंधक यंत्रे कालबाह्य झाली असून, ती तातडीने रिफिलिंग करून घेणे गरजेचे आहे.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या खांद्यावर आहे. जिल्ह्यातील एक हजार 602 गावांतील नागरिकांना 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 555 उपकेंद्रांमार्फत आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उत्कृष्ट पुरविण्यात येत असल्या, तरी रुग्णालयांतील आगप्रतिबंधक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. जिल्ह्यातील बरीच प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतील आगप्रतिबंधक यंत्रे कालबाह्य झाली आहेत. प्रशासनाने तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांचे फायर सेफ्टी ऑडिट करून घ्यावे, अशी मागणी होत आहे.
व्हीआरडीईचे स्थलांतर होणार नाही : गांधी
ग्रामीण विकास यंत्रणा सुरक्षेविनाच
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून आगप्रतिबंधक उपाययोजना करण्यात आली नाही. या कार्यालयात तशी गरज असतानाही वर्षानुवर्षे तसेच कामकाज केले जात असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
कालबाह्य झालेली यंत्रे
नगर पंचायत समितीमध्ये आगप्रतिबंधक दोन यंत्रे ठेवण्यात आली आहेत. त्यांचे 2013 मध्ये नूतनीकरण करण्यात आले. त्याची मुदत 2016 मध्ये संपली आहे. असे असतानाही कार्यालयाबाहेर कालबाह्य झालेली आगप्रतिबंधक यंत्रे लटकवून ठेवण्यात आली आहेत.