राजकारणात टिकून राहिलो याचे सर्व श्रेय जनतेचे, सत्तेचा उपयोग दुर्गम भागासाठी : काशिनाथ दाते

सनी सोनवाळे
Friday, 11 December 2020

तीस- पस्तीस वर्षे जनतेने माझ्यावर निर्विवाद विश्वास ठेवला व मला सहकार्य केले.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : तीस- पस्तीस वर्षे जनतेने माझ्यावर निर्विवाद विश्वास ठेवला व मला सहकार्य केले. परंतु सध्या मला बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न सुरू आहे. माझ्यावर वेगवेगळे खोटे आरोप केले जातात.

याकडे दुर्लक्ष करत सत्तेच्या माध्यमातून दुर्गम गावांचा विकास कसा होईल, याकडे आमचे प्राधान्य आहे. राजकारणात टिकून राहिलो याचे सर्व श्रेय जनतेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी केले.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पारनेर तालुक्यातील शिंदेवाडी फाटा येथील सभामंडप, रस्ता डांबरीकरण, म्हसोबाझाप व कन्हेर येथील स्मशानभूमी सुशोभिकरण यासंह अन्य विकासकामांचा शुभारंभ दाते यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होतेयावेळी उपसरपंच भाऊसाहेब आहेर,तुकाराम दरेकर,भाऊसाहेब दाते,गोविंद आग्रे,संजय आहेर, जयसिंग आग्रे उपस्थित होते.
 

दाते म्हणाले,विकास हा शेवटच्या घटकांपर्यंत पोहचला पाहीजे हा उद्देश ठेवुन कामे सुरू आहेत.पोखरी ते जांबुत रस्ता हा अतिशय महत्वाचा होता या रस्त्याची मागणी फार दिवसांची होती,गाजदीपुर शाळा खोली,अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा दुर्गम भागातील काळेवाडी- बोरमाळी रस्ता या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad Agriculture and Construction Department Chairman Kashinat Date said