जिल्हा परिषदेच्या इमारतीचे दिवसातून दोनदा सॅनिटाईझ करा हो...

दौलत झावरे
रविवार, 12 जुलै 2020

मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग प्रशासनाकडून केले जात असले, तरी इमारतीत बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र कोणत्याच उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या नाहीत.

नगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा दिवस-रात्र राबत आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जात असले, तरी इमारतीतील सर्व विभागांत सॅनिटाईझ केले जात नसल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने दिवसातून इमारतीत दोनदा सॅनिटाईझ करावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा ः  नगर झेडपीच्या इमारतीत बाटल्यांची "पेरणी', चर्चेचे पीक लय जोमात 
 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात 500 कर्मचारी कार्यरत आहेत. रोज ते नित्यनियमाने सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत कामकाज करतात. जिल्हा परिषदेत रोज 500 ते 700 जण कामानिमित्ताने येतात. 

मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग प्रशासनाकडून केले जात असले, तरी इमारतीत बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र कोणत्याच उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या नाहीत.

अवश्य वाचा ः  प्रशासकीय ऐवजी विनंती व आपसी बदल्या करा 

शहरासह जिल्ह्यात अनेक कर्मचारी मुख्यालयात नोकरीसाठी येतात. तसेच बाहेरील व्यक्तीही जिल्हा परिषदेत नेहमीच येतात. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्यालयाचा सर्वच परिसर सॅनिटाईझ करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. 

कोरोनाला अटकाव करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, थर्मल स्कॅनिंग करून प्रत्येकाची माहिती नोंदवून घेतली जात आहे. यापुढे आणखी उपाययोजना कडक करण्याचा निर्णय घेण्यात येईल. 
- राजश्री घुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद 

जिल्हा परिषदेच्या इमारतीत सॅनिटाईझ होत नसल्याचे जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह भेटी देणाऱ्यांकडून समजले. प्रशासनाने जिल्हा परिषदेत घेत असलेल्या उपाययोजना कडक करून इमारत सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे. 
- राजेश परजणे, सदस्य, जिल्हा परिषद  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad needs to be sanitized ...