

Illegal Sale of Zilla Parishad School Land Exposed in Shrirampur
Sakal
श्रीरामपूर : गळनिंब (ता. श्रीरामपूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शासकीय जागेची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पाच जणांविरुद्ध फसवणूक व बनावट दस्तऐवज प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.