
पाण्याचा हा लाल/गुलाबी रंग पावसाचे पाणी सरोवरात मिसळल्यानंतर हळूहळू कमी होऊन पूर्ववत होऊ शकते. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे मत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
अकोला : जग विख्यात लोणार सरोवरातील पाणी लाल झाल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच अकोला येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील भूगर्भशास्त्र व रसायनशास्त्र विभागाच्या अभ्यासू प्राध्यापकांनी लोणार येथे धाव घेत अभ्यास सुरू केला आहे. प्राथमिक अभ्यासानुसार सरोवराचे पाणी लाल होण्यामागे पूर्ण जैवीक प्रक्रिया करणीभूत आहे.
पाण्याचा हा लाल/गुलाबी रंग पावसाचे पाणी सरोवरात मिसळल्यानंतर हळूहळू कमी होऊन पूर्ववत होऊ शकते. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे मत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. तथापि याविषयी पुढील संशोधन झाल्यानंतर आवश्यक बाबींना दुजोरा मिळू शकतो. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशीत झाल्यानंतर अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी महाविद्यालयातील अभ्यासू प्राध्यापकांना थेट लोणार सरोवरावर अभ्यासासाठी पाठविले. त्यानुसार भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गणेश गायकवाड व रसायनशास्त्र विभागाचे डॉ. गजानन कोरपे यांनी लोणार सरोवराचा नव्याने अभ्यास सुरू केला आहे.
महत्त्वाची बातमी - अकोला व औरंगाबाद जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला प्रोत्साहन
‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशीत झाल्यानंतर अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी महाविद्यालयातील अभ्यासू प्राध्यापकांना थेट लोणार सरोवरावर अभ्यासासाठी पाठविले. त्यानुसार भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गणेश गायकवाड व रसायनशास्त्र विभागाचे डॉ. गजानन कोरपे यांनी लोणार सरोवराचा नव्याने अभ्यास सुरू केला आहे. दरम्यान, लोणार सरोवर हे जगातील बेसाल्ट खडकातील खाऱ्या पाण्याचे दक्खनच्या पठारावरील उल्कापातामुळे तयार झालेले एकमेव सरोवर आहे. जैवविविधतेने परिपूर्ण सरोवराचा परिसर नेहमीच संशोधक तसेच पर्यटकांकरिता कुतुहलाचा विषय राहिलेला आहे.
हेही वाचा - अन् हे तं डबल पिऊन रायले वं माय...
मग ते सरोवराच्या निर्मिती संदर्भातील असो किंवा त्यामध्ये भेटणार्या जीवश्रुष्टि विषयी असो. मागील काही दिवसांपासून सरोवराचे नेहमी हिरवेगार दिसणारे पाणी हे गडद गुलाबी दिसायला लागले आहे. यामागे बरेच तर्क लावले जात आहेत व सरोवराच्या पारिषेत्रातील नागरिकामद्धे बराच संभ्रम निर्माण झाला आहे. यामागे काही भुशास्त्रीय घटना जसे की संभावित ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप किंवा इतर काही भूगर्भतील हालचालींचा तर यामध्ये समावेश नाही असापण प्रश्न विचारल्या जात आहे. सध्यस्तीतीत तलावाची पाहणी केली असता अशी कोणताही भुशास्त्रीय घटना सरोवराचे पाणी गुलाबी होण्यामागे दिसतं नाही.
सरोवराच्या परिसरामध्ये असलेला लाल गेरू जो दोन खडकांच्या थरांच्या मध्ये लालसर मातीसारखा दिसतो त्यामधून भूजल प्रवाह सरोवराच्या पाण्याला मिळून सरोवराचे पाणी लाल झाले असावे असा सुद्धा काही नगरीकांकडून कयास बांधल्या जातोय. परंतु सदर भूजल प्रवाह हे भाजलेल्या मातीच्या स्तरांमधून येतात व त्यामधून याप्रकारचे रंग पाण्यामद्धे सहसा मिसळत नाहीत तसेच सरोवराच्या परीघ क्षेत्रातील व आजूबाजूच्या परिसरामध्ये बेसाल्ट खडक आढळतो या खडकांमध्ये पाण्याला असा रंग देणारी खनिजे नाहीत किंवा जी खनिजे बेसाल्ट खडकामधे भेटतात ती सहज पाण्यामद्धे खडकातून विघटित होत नाहीत.
सरोवराचे पाणी लाल होण्यामागे पूर्ण जैवीक प्रक्रिया करणीभूत आहे. सध्यस्थितिमध्ये सरोवराच्या पाण्याची पीएच ही 10.5 एवढी आहे व पाण्याची क्षारता ही समुद्राच्या पाण्यापेक्षा जास्त आहे. अश्याच प्रकारचे खारे पाणी असलेले ऑस्ट्रेलियामधील लेक हिलीयर, स्पेन मधील Las Salinas de Torrivieja तसेच रशीया मधील Sivash salt Lagoons हे काही गुलाबी पाण्याचे सरोवरे आहेत. काही संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की अश्या सरोवरांच्या पाण्यातील या विशेषतेमुळे Dunaliella salina ही halophile green micro-algae प्रवर्गातील समुद्र क्षारयुक्ता पाण्यामध्ये मिळणारी अल्गि या पाण्यामध्ये मिळते.
ज्यावेळेस पाण्यामद्धे बाष्पीभवन जास्त होते व पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाणजास्त होते तसेच दमट हवामानामध्ये ही अल्गि अन्न व ऊर्जा तयार करताना प्रकाशाच्या विसीबल रीजन मध्ये लाल/नारंगी लहरी सोडून इतर सर्व प्रकाश वापरल्या जातो व याप्रकारे अल्गिद्वारे न वापरलेले प्रकाश लहरी गुलाबी रंगात दिसते. म्हणून अश्याच प्रकारची अल्गि सरोवराच्या पाण्यात असावी व पाण्याचा रंग हा गुलाबी दिसत असावा असा अंदाज आहे. पाण्याचा हा लाल/गुलाबी रंग पावसाचे पाणी सरोवरात मिसळल्यानंतर हळूहळू कमी होऊन पूर्ववत होऊ शकते. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही असे भूगर्भशास्त्र व रसायनशास्त्र विभाग, श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला यांच्या प्राध्यापकांच्यावतीने सांगण्यात आले. तरी याविषयी पुढील संशोधन झाल्यास या बाबींना दुजोरा मिळू शकतो.